‘शिवस्मारक’ समुद्रात नाही तर जमिनीवर बांधा, मराठा सेवा संघाची राज्य सरकारकडे ‘मागणी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवस्मारकावरुन पुन्हा वाद सुरु झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक समुद्रात नाही तर जमिनीवर बांधा अशी मागणी मराठा सेवा संघाकडून होऊ लागली आहे.
मराठा सेवा संघाकडून राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली की समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक तांत्रिकदृष्या अवघड, खार्चिक आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील अवघड असेल. त्यामुळे शिवस्मारक समुद्रात नाही तर जमिनीवर बांधा.

यावर बोलताना मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की तात्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना हे स्मारक जमिनीवरुन अचानक अरबी समुद्रात हलवण्यात आले होते, तेव्हा देखील आम्ही विरोध केला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना देखील आमची त्यांच्याशी चर्चा झाली होती, तेव्हापासून आमची मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईत जमिनीवर व्हावे.

खेडेकर पुढे म्हणाले की तांत्रिक कारणाने हे स्मारक अरबी समुद्रात होणे अवघड आहे. मूर्तीची उंची किती असावी हा काही शिवप्रेमींचा प्रश्न नाही, त्यापेक्षा उत्तम दर्जाचे स्मारक व्हावे. समुद्रात स्मारक झाले तर त्यासाठी प्रवासाचा खर्च वाढेल. तेथे जास्त लोक जाऊ शकणार नाही. कारण क्षमतेचा देखील विचार होईल. परंतु हेच स्मारक जर जमिनीवर असेल तर 10 20 हजार लोक तेथे एकावेळी जमू शकतील. समुद्रातील हे स्मारक तांत्रिकदृष्ट्या अवघड, खर्चिक असेल आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने देखील अवघड असेल. त्यामुळे शिवस्मारक अरबी समुद्रात नाही तर जमिनीवर व्हावे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/