Builder Amit Lunkad | बिल्डर अमित लुंकडच्या माणसांनी धमकावल्याची लेखी तक्रार पुणे पोलिसांकडे; प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता, जाणून घ्या प्रकरण

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्या माणसांचा पोलीस आयुक्तालयातच ‘राबता’ असून, पोलिसांकडे आलेल्या तक्रारदार यांना ही माणसं आयुक्तालयात गाठत ‘पैसे’ देऊ म्हणून लुंकड यांच्या ऑफिसात नेत आहेत. तर त्याठिकाणी संबंधित रक्कमेबाबत बोलणीकरून त्यांना पाहिजे इतके पैसे देऊन इतर रक्कमेबाबत पुढच्या तारखा आणि चेक देत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या सर्व प्रकारात एका तक्रारदाराला संबंधितांनी दोन वेळा लुंकड यांच्या ऑफिसला नेत धमकावले असल्याची लेखी तक्रार आता एकाने पोलिसांकडे केली आहे. त्यामुळे बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांच्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Builder Amit Lunkad | Builder Amit Lunkad’s men give threat to depositor, he lodged a written complaint with Pune Police; Chances are the case will take a different turn, know the case

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) दाखल असणाऱ्या 25 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात प्रसिद्ध बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक (Arrest) केली. गेल्या काही दिवसांपासून लुंकड न्यायालयीन कोठडीत होते. आज न्यायालयाने त्यांना अटी व शर्तीवर जामीन दिला आहे. पण या कालावधीत त्यांच्याविरोधात पुणे शहर पोलीस (Pune City Police) दलात 38 तक्रारी आल्या आहेत. त्याचा आकडा 62 कोटींच्या जवळपास गेला आहे. मात्र, हे तक्रारदार गुन्हा दाखल करण्यास पुढे येत नसल्याचे पोलिस सांगतात.

अमित लुंकड (Amit Lunkad) यांना अटक केल्यापासून लुंकड यांच्याशी संबंधित लोक पोलीस आयुक्तालयात असल्याची माहिती आहे.
ही माणसं आलेल्या तक्रारदारांना गाठतात. त्यांच्याशी बोलणी करतात. त्यांना त्यांच्या ऑफिसात घेऊन जात आहेत. त्याठिकाणी त्यांच्यासोबत पैसे-गुंतवणूक रक्कम परत केली जात आहे. मात्र, सर्वांनाच त्यांची पूर्ण रक्कम परत केली जात नसून, काही रक्कम देऊन इतर रक्कम त्यांना नंतर दिली जाईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे काही तक्रारदार पुन्हा आयुक्तालयात धाव घेत आहेत.

एका तक्रारदाराबाबत हा प्रकार घडला असून, त्यांना दोन वेळा पोलीस आयुक्तालयातून नेण्यात आले आहे. त्यांनी 18 लाख रुपये लुंकड यांच्याकडे गुंतवले आहेत.
मात्र त्यांना 5 लाख रुपये देऊ. इतर पैसे दिवाळीदरम्यान दिले जातील असे सांगण्यात आले आहे.
याबाबत त्यांनी नकार दिला आहे. त्यांनी आता याबाबत पुन्हा पोलीस आयुक्तालयात (police commissionerate) धाव घेत लेखी तक्रार दिली आहे.
त्यात त्यांनी या माणसांचा उल्लेख केला आहे. तर त्यांनी धमकावले असेही लिहिले आहे.

पोलीस आयुक्त कार्यालयात (police commissioner office pune) गेट नंबर तीनमधून प्रत्येक व्यक्तीला आणि इतर पोलिसांना प्रवेश आहे.
येथे चौकशी करूनच प्रत्येकाला आत सोडले जाते.
मग लुंकड यांचे लोक पोलीस आयुक्तालयात (police commissionerate) येतात कशी आणि त्यांचा राबता कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या 38 तक्रारीत 22 तक्रारी या एकट्या लुंकड फर्मबाबत आहेत. तर 16 तक्रारी या लुंकड आणि असोसियट (भागीदार) यांच्या विरोधात आहेत.
यात 48 कोटी 50 लाख रुपयांची दोन तक्रारी या शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक शोभा धारिवाल यांच्या आहेत. त्यात 40 कोटींची एक आणि 8 कोटी 50 लाख रुपयांची एक आहे.
आता हे देखील इतर तक्रारदार यांच्या प्रमाणे बाहेरच मिटले असल्याचेही माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार नाही.
धारिवाल व त्यांच्यात भागीदारीत काही व्यवसाय आहेत. त्यातून ही फसवणूक झाल्याची तक्रार होती.

…तर कायदेशीर कारवाई होणार – पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके

या सर्व प्रकरणाबाबत पुण्याच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके (deputy commissioner of police bhagyashree navtake) यांच्याशी पोलीसनामा ऑनलाइनने (Policenama Online) संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कालच तक्रार आलेली आहे. याची आम्ही चौकशी करत आहोत. तपासात निष्पन्न होईल त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Builder Amit Lunkad | Builder Amit Lunkad’s men give threat to depositor,
he lodged a written complaint with Pune Police; Chances are the case will take a different turn, know the case

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर