Builder Amit Lunkad News | बिल्डर लुंकड यांना जामीन ! पण 8 दिवसात पासपोर्ट जमा करण्याचा आदेश; महिन्यातून 2 वेळा पोलिस ठाण्यात लावावी लागेल हजेरी

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – गुंतवणुकदारांना चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांचे पैसे वेळेवर परत न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायीक अमित कांतीलाल लुंकड (Builder Amit Kantilal Lunkad) यांना एक लाख रुपयांच्या वैयक्तीक जात मुचलक्या जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला. जामिन मिळाल्यानं बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

अमित लुंकड (Amit Lunkad) यांच्यावर महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय विलास होनराव (वय. 48, रा. दत्तनगर, आंबेगाव) Sanjay Vilas Honrao यांनी येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली. न्यायालयात झालेल्या दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर, न्यायालयाने लुंकड यांना आठ दिवसाच्या आत पोलिसांकडे पासपोर्ट (Passport) जमा करण्याचे आदेश दिले आहेत. महिन्यातून दोनदा येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police Station) हजेरी लावण्याबरोबरच जामीन झालेल्या दिवसापासून आठ दिवसांत लुंकड यांनी न्यायालयात हमीपत्र द्यावे, ज्या गुंतवणुकदारांची देणी अद्याप शिल्लक आहे आणि जे गुंतवणुकदार पुढे ही गुंतवणुक करू इच्छित नाही अशा सर्वांच्या रकमा परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमित लुंकड (Amit Lunkad) यांच्या वतीने अ‍ॅड. सुधीर शहा advocate sudhir shah, अ‍ॅड. जितेंद्र सावंत advocate jitendra sawant, अ‍ॅड. राहुल भरेकर advocate rahul bharekar यांनी युक्तीवाद केला.

…तर संपत्तीवर जप्ती येवून होणार लिलाव :

गुंतवणुकदारांनी मागणी केल्याप्रमाणे अमित लुंकड (Amit Lunkad) यांनी गुंतवणुकदारांचे पैसे परत केले नाही तर त्यांच्या संपत्तीवर जप्ती आणून तिची विक्री करून गुंतवणुकदारांचे पैसे देण्यात येईल,
असे आदेशात नमूद करण्यात आाले आहे.
अशा परिस्थितीत लुंकड यांच्या घरच्यांनी संपत्तीबाबत कोणतेही अडथळे निर्माण न करता हक्क दाखवायचे नाहीत.
तसेच गुंतवणुकदारांनी मागितल्याप्रमाणे पैसे दिले नाही तर जामीन नामंजूर करण्यात येईल अशा कडक व अटी शर्ती हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण
याबाबत दाखल असलेल्या फिर्यादीनुसार,
कल्याणीनगर येथील स्कॉय वन बिल्डिंगमधील कार्यालयात होनराव यांनी अमित लुंकड यांची भेट घेतली.
तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना तुम्ही गुंतविलेल्या रकमेवर प्रतिमहिना १५ टक्के परतावा देऊ,
असे प्रलोभन दाखविले.
त्यामुळे विश्वास ठेवत फिर्यादी यांनी लुंकड रिअ‍ॅलिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या फर्ममध्ये वेळोवेळी पैसे भरून २१ लाख २६ हजार रुपयांची गुंतवणूक केली.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे गुंतविलेल्या रकमेवर प्रतिमहिना १५ टक्के परतावा न देता फिर्यादीची लुंकड यांनी फसवणूक केली म्हणून फिर्याद दिली होती.

Web Title :-  Builder Amit Lunkad News | Builder Lunkad granted bail But ordered to submit the passport within 8 days; Attendance at the police station is required twice a month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

WhatsApp | ‘या’ अकाऊंट्सवरून चॅट्दरम्यान दिसणार नाही ऑनलाइन स्टेटस, लास्ट सीन सुद्धा नसेल

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6,727 नवीन रुग्ण, तर 10,812 जणांना डिस्चार्ज

Doping Test | डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूवर 4 वर्षांची बंदी

Ladakh Standoff | 70 वर्षात वर्षात पहिल्यांदा भारताने बदलली भूमिका, चीनसोबत सीमेवर पुन्हा तैनात केले 50,000 सैनिक