Builder Avinash Bhosale | सरकारने जाहीर केलेल्या ‘या’ सवलतीचा लाभ घेऊन घेतला तब्बल 103 कोटींचा फ्लॅट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याचे मोठे बांधकाम उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलतीचा (stamp duty savings) लाभ घेऊन एक फ्लॅट खरेदी केल्याचे समोर आले आहे. अविनाश भोसले यांनी दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोडवर (Napian Sea Road in South Mumbai) एक डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केल्याची माहिती पुढं आली आहे. मागील काही महिन्यात बिल्डर अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) छापा टाकण्यात आला होता. तेव्हापासून त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

यामध्येच आता अविनाश भोसले यांनी आणखी एक पराक्रम करत एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. दक्षिण मुंबईमध्ये त्यांच्या एबीज्स रिअलकॉन एलएलपी (Abyss Realcon LLP) या कंपनीने मुबईमध्ये एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. त्याची किंमत जवळपास 103 कोटी 80 लाख रुपये आहे. तर 31 मार्च रोजी हा फ्लॅट खरेदी करण्याचा व्यवहार पूर्ण झाला आहे. असे एका वृत्तावरून समजते.

दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोडवर सेसन टॉवर आहे.
यामध्ये तब्बल 53 आणि 54 व्या मजल्यावर हा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला आहे.
तब्बल 7118 चौरस फूट असणारा इतका मोठा हा फ्लॅट खरेदी करण्यात आला आहे.
तसेच, या फ्लॅटच्या खरेदीसाठी 3 कोटी ४० लाख रुपये इतके मुद्रांक शुल्क भरले आहे.
मुखतः राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्क सवलत जारी करण्यात आली होती.
तसेच, जानेवारी ते मार्च महिन्याच्या (2021) काळामध्ये मुद्रांक शुल्क 5 टक्क्यांवरून 3 टक्के इतके केले होते.
इतकंच नाही तर व्यवहाराची रजिस्टर नंतर करण्यास सरकारकडून परवानगी देखील देण्यात आली होती.
याच संधीला मूळ धरून त्याचा चा फायदा घेत अविनाश भोसले यांनी एक फ्लॅट खरेदी केला.
या दरम्यान, सेसन टॉवरमध्ये आणखी एक मोठा व्यवहार झाला आहे.
एस.एम डायकेम कंपनीने 51 आणि 52 मजल्यावर 103 कोटी 65 लाख रुपयात फ्लॅट खरेदी केला आहे.
मे महिन्यात याची नोंदणी झाली असल्याचे समजते.

Wab Title :- builder avinash bhosale bought a flat worth rs 103 crore on nepian sea road in south mumbai using Stamp duty discount of government scheme

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

Pune News | पाणी पिण्याच्या वादातून ‘गोवा एक्सप्रेस’ मधून फेकलं, एकचा जागीच मृत्यू

धक्कादायक ! प्रियकराच्या मित्रांनी शरीसंबंधांसाठी केली जबरदस्ती, नकार देताच तरुणीचा चाकूने भोसकून केला खून

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा