‘बिल्डर’कडून वीटभट्टी चालकाची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – बांधकामासाठी विटा घेऊन त्याबदल्यात फ्लॅट देण्याचे ठरवून तो न देता वीटभट्टी व्यावसायिकाची ‘बिल्डर’ने ४७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मार्च २०१६ साली देहूरोड येथे घडला.

या प्रकरणी महेश शिवाजी राऊत (३०, रा. मामुर्डी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली. तर सुरेश पुंडलिक शिरोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश शिरोडे हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याची भूमी क्रिएशन ही कंपनी आहे. तर महेश यांची वीटभट्टी आहे.

सुरेश याने महेश यांच्या वीटभट्टीवरून त्याच्या बांधकाम साईटसाठी लागणाऱ्या विटा घेतल्या. या विटांच्या बदल्यात सुरेश हा महेश यांना त्याच्या भूमीवर ओराबेल या इमारतीमध्ये एक फ्लॅट देणार असल्याचे ठरले. मात्र, ठरल्याप्रमाणे सुरेश याने महेश यांना फ्लॅट न देता त्यांच्याकडून घेतलेल्या विटांचे एकूण ४७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –