जळगावात बिल्डरची गळफास लावून आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव शहरातील बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिल जगन्नाथ सूर्यवंशी (वय-54 रा. अष्टभूजा नगर, पिंप्राळा) असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसिकाचे नाव आहे. हा प्रकार आज (मंगळवार) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

अनिल सूर्यवंशी यांनी त्यांच्या बांधकामाच्या ठिकाणी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आले. सूर्यवंशी यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.

अनिल सूर्यवंशी हे शहरातील बांधकाम व्यवसायिक होते. त्यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून सूर्यवंशी यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास सुरु केला आहे. सूर्यवंशी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत.