रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळली, 50 पेक्षा जास्त फ्लॅट असल्यानं मोठ्या जीवितहानीचा धोका !

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – रायगड जिल्ह्यात 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील महाडमधील ही घटना आहे. या इमारतीत 60 पेक्षा जास्त फ्लॅट होते अशी माहिती आहे. 47 कुटुंब यात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोसळलेल्या इमारतीचं नाव तारीक गार्डन आहे असंही समजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाड शहारातील काजळपुरा भागात ही इमारत होती. अनेक कुटुंब यात राहात असल्यानं मोठी जीवितहानी झाली असावी अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मृत किंवा जखमींचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.

गेल्या काही वर्षात या भागात सिंगल लोड बेअरींग इमारतींचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. हा प्रकार जीवघेणा आहे. प्रशासनही याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप केला जात आहे.

बिल्डींग पडल्यामुळं 200 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती मंत्री आदिती सुनिल तटकरे यांनी दिली आहे.