इमारत कोसळून अडकलेल्या वृद्धेला सुखरूप बाहेर काढले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली असून, आज सकाळपासूनच शहरात मोठ्या स्वरूपाचा पाऊस सतत सुरू आहे. या पावसामुळे कोर्ट गल्ली परिसरातील टांगेगल्ली येथे ठाणेकर वाडा म्हणून एक इमारत कोसळल्याने यामध्ये एक 65 वर्षीय महिला उषा त्रंबकेश्वर कावस्कर अडकून पडली होती. मात्र नगरच्या अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या महिलेला सुखरूपपणे बाहेर काढले आहे.

65 वर्षीय महिला या वाड्यात एकटीच राहत होती. गेल्या दोन दिवसापासून पडलेल्या संततधार पावसाने जीर्ण झालेला वाड्याचा काही भाग पडल्याने महिला आतमध्ये अडकली होती.

घटनास्थळी मंडलाधिकारी, तलाठी आणि परिसरातील नागरिक, नगरसेवक यांनी तातडीने मदत केल्याने महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. सुदैवाने त्या मुलीला कोणतीही हानी झाली नाही. त्या महिलेला सुखरुप दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे.

You might also like