पावणे सात कोटींची ‘ती’ इमारत ५ वर्षे पडून ; कॅगचे शासनावर ‘गंभीर’ आक्षेप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलांसाठी अतिरिक्त निवास उपलब्ध करुन देण्यासाठी योजना आखली. त्यासाठी ६ कोटी ७१ लाख रुपये खर्चुन इमारत बांधली. पण केवळ कागदपत्रांची पुर्तता न केल्याने गेली ५ वर्षे ही इमारत पडून असल्याचा गंभीर करुन ही योजनाच फेल ठरल्याचा आक्षेप कॅगने घेतला आहे.

भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांनी सामान्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध विभागांच्या कामकाजाचे अनेक गंभीर निष्कर्ष आपल्या अहवालातून समोर आणले आहेत. यामुळे सरकारचे काही ठिकाणी आर्थिक नुकसान झाले आहे तर काही ठिकाणी विकासकांना अवाजवी फायदे झाले आहेत.

महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम या दोन्ही विभागांनी शासकीय कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ६.७१ कोटी रुपये खर्च करून बांधलेली शासकीय राज्यगृह इमारत पाच वर्षांपासून अधिक काळ विनावापर पडून राहिली. मानवी तस्करीला बळी पडलेल्या महिलांसाठी अतिरिक्त निवास उपलब्ध करून देण्याच्या योजनाच फोल ठरल्याचे कॅगने म्हटले आहे.

नागपूर गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाने नागपूर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केल्यामुळे १२४.२० कोटी विक्री किंमत दिल्यानंतरही नागपूरच्या दोन गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी ३ ते ४ वर्षें उलटूनही घरांपासून वंचित राहिले. उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास योजनांना मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने दिलेल्या चुकीच्या मंजुरीमुळे बिल्डरचा ८.६४ कोटीचा आर्थिक फायदा झाला. असे अनेक आक्षेप कॅगने आपल्या अहवालात घेतले आहेत. सरकारने कॅगचा अहवाल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पटलावर ठेवला.

पण, या सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने त्यावर विरोधकांनीही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला नाही. शेवटच्या दिवशी सभागृहात आमदारांची संख्या खूपच रोडावलेली होती. मुंबईतील पावसामुळे अनेक आमदारांनी विधान भवनात न येण्याचा निर्णय घेतलेला दिसत होता. त्यामुळे काँग्रेसच्या काळात भाजप या कॅगच्या अहवालावरुन जसा गदारोळ करुन सरकारला घेरत असे तसे काहीही यावेळी दिसून आले नाही.

तुम्ही खात असलेले अन्न हे शरीर व मनासाठी आरोग्यवर्धक आहे का ?

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

‘तारूण्य’ टिकवण्यासाठी हसत रहा, जाणून घ्या महत्वाचे फायदे