Buildings Risk of Collapse in Mumbai | मुंबईतील अतिधोकादायक 21 इमारतींची यादी MHADA कडून जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील जीर्ण झालेल्या अन् पावसाळ्यात (rain) कोसळण्याची शक्यता असलेल्या अशा 21 अतिधोकादायक इमारतीची यादी म्हाडाने (MHADA) जाहीर केली आहे. या यादीत काळा घोडा येथील ऐतिहासिक एस्प्लानेड मेनशचाही समावेश आहे. तसेच बाबुला टॅंक, मुंबादेवी, मस्जिद, व्ही. पी. रोड, सोनापूर, भोईवाडा आणि उमरखडीतील काही इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत.

म्हाडाच्या MHADA वांद्रे येथील मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत (Press conference) मुंबई दुरुस्ती (Mumbai Repair) व पुर्नरचना मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी याबाबतची माहिती दिली. घोसाळकर म्हणाले की, मे आणि जून या महिन्याच्या दरम्यान इमारतींचे सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार त्यात 21 इमारती अतिधोकादायक आढळल्या होत्या. या धोकादायक 21 इमारतींमध्ये 10 अशा इमारती आहेत, ज्यांचा समावेश 2020 च्या यादीतही आहे. त्या इमारतींमध्ये 460 रहिवासी होते. ज्यापैकी 193 रहिवाशांनी स्वतःची व्यवस्था करुन घर रिकामी केली आहेत. आम्ही 20 लोकांचे स्थांतर केले असून लवकरच 247 जणांसाठी पुनर्वसन योजना आखत आहोत. म्हाडाची MHADA ताडदेव येथे 24 तास हेल्पलाईन कार्यरत असून ही हेल्पलाईन आपत्ती व्यवस्थापनाचे काम करते. तसेच म्हाडा पावसाळ्यात कार्यशील आणि सक्रीय असल्याचे ते म्हणाले.

हे देखील वाचा

Mumbai Building Collapse | मुंबईत मालाडच्या मालवणी येथील 4 मजली रहिवासी इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

आमची वाघाशी दुश्मनी कधीच नव्हती, दोस्ती करायला कधीही तयार, चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान (व्हिडीओ)

Pune Crime News : कोंढव्यात भाजी विक्रेत्याच्या गालावर चाकूने वार

Aurangabad News | औरंगाबादमध्ये वीज कोसळून युवतीचा दुर्देवी मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

Pimpri News | तरुणाविषयी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; केली आत्महत्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Wab Title : Buildings Risk of Collapse in Mumbai | mhada has declared 21 mumbai city buildings risk of collapse during monsoon