Lockdown : पोलीस अधिकाऱ्याच्या रिव्हॉल्व्हर मधून सुटली गोळी, सहकारी अधिकाऱ्याचा गेला ‘जीव’

पटना :  वृत्तसंस्था –   उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये शुक्रवारी रात्री एका इन्स्पेक्टरच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार झाल्याने दुसर्‍या इन्स्पेक्टरचा जीव गेला. ही घटना जिल्ह्यातील बीबी नगर पोलिस ठाण्याच्या सरकारी निवासस्थानाची आहे. घटनेनंतर ज्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आली त्या निरीक्षकांनी जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याचे पाहून आरोपी कारमधून पळून गेला. पोलिसांनी लोकेशन शोधून आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री पोलिस ठाण्यात तैनात निरीक्षक विजेंद्रसिंग तिसर्‍या मजल्यावरील त्यांच्या रम मध्ये होते . मध्यरात्री आणखी एक निरीक्षक नरेंद्र सिंह फ्रेश व्हायला गेले. असे म्हटले जाते की याचदरम्यान नरेंद्र सिंहच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी चालविली गेली. नरेंद्रच्या रिवॉल्व्हरमधून निघालेली गोळी विजेंदरच्या पोटात घुसली . नरेंद्रसिंग पोलिस स्टेशनच्या क्लार्कच्या मदतीने गंभीर जखमी असलेल्या विजेंद्र यांना तातडीने आपल्या खासगी कारमधून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले .

उपचारादरम्यान जखमी विजेंद्रची प्रकृती बिघडू लागली. हे पाहून नरेंद्र सिंहने तेथून गाडी घेऊन पळ काढला . पोलिस स्टेशनच्या मुंशी यांनी उच्च अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताचअधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस स्टेशन गाठले आणि सीडीआरमार्गे ते ठिकाण शोधून काढले आणि मसूरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या सहकार्याने आरोपी नरेंद्र सिंह यांना गाझियाबाद ते हापूर जिल्ह्या दरम्यान अटक केली.

सुरुवातीच्या चौकशीत आरोपी नरेंद्र सिंह यांनी सांगितले की ते फ्रेश होण्यासाठी विजेंद्रच्या खोलीत गेले होते. अचानक रोव्हॉल्व्हर मधून गोळी उडाली. यासंदर्भात बुलंदशहरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संतोष कुमार सिंह म्हणाले की, या प्रकरणाचा तपास केला जात आहे. त्याचवेळी या घटनेने मात्र पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.