उत्तरप्रदेशातील ‘या’ भाजप उमेदवाराला केलं नजरकैद, ही घडली चूक

बुलंदशहर : वृत्तसंस्था – दुसऱ्या टप्प्यातील ९५ मतदारसंघांमध्ये मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. दरम्यान उत्तरप्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील भोला सिंह या उमेदवाराला नजरकैद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन आचारसंहितेचा भंग केल्याचा प्रकार समोर आल्यावर नोटीस जारी करत त्यांना नजकैद करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील ९५ मतदारंसघांमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजपचे बुलंदशहर येथील उमेदवार भोला सिंह यांनी मतदान केंद्रातील लोकांना भेटून त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतल भोला सिंह यांना नोटीस बजावली. तसेच त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अभय सिंह यांनी नजरकैद करण्याचा आदेश दिला.

उत्तर प्रदेशातील अलीगढ़, अमरोहा, बुलंदशहर, हाथरस, मथुरा, आगरा, फतेहपुर सीकरी आणि नगीना येथील जागांवर आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरु आहे. देशभरातील दिग्गजांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे.