ड्युटीवर असतानाही ढोसत होते दारू, रायफलची देखील चोरी, 3 पोलीसकर्मचारी निलंबीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरात कर्तव्य बजावताना निष्काळजीपणा बाळगणाऱ्या आणि पोलिसांची प्रतिमा डागाळण्याच्या आरोपाखाली तीन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. माहितीनुसार वरिष्ठ पोलिस अधीक्षक संतोषकुमार सिंग यांनी कॉन्स्टेबल अनुज कुमार, सतींदर कुमार आणि सरशाद खान यांना कर्तव्य बजावताना दारू पिण्याच्या आणि एका व्यक्तीची रायफल चोरी केल्याच्या आरोपावरून निलंबित केले.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनुज कुमारच्या चुलतभावाने 3 फेब्रुवारी रोजी त्यांची रायफल चोरली. वरिष्ठ पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, अनुज आणि त्याचा चुलत भावा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांच्या अनेक पथकांना रायफल जमा करण्यासाठी तैनात केले आहे.

गेल्या वर्षी येथे सुधारगृहातून 17 अल्पवयीन मुलांचा बचाव केल्याच्या घटनेसंदर्भात कर्तव्य बजावताना दुर्लक्ष केल्याच्या आरोपाखाली दोन कॉन्स्टेबलना हरियाणा पोलिसांनी बरखास्त केले आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, रघुविंदर आणि विनोद यांच्या सेवा संपुष्टात आल्या आहेत. गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला हिसारमधील सुधारगृहातून 17 अल्पवयीन मुले पळून गेली आणि त्यातील 12 जणांना नंतर अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस प्रमुख बलवानसिंग राणा यांनी याच प्रकरणात आणखी एक हवालदार विजेंद्रसिंग यांच्या पगारावर वाढीस स्थगितीचे आदेश दिले आहेत. पोलिस प्रवक्त्याने याााबाबतब माहिती दिली.

ते म्हणाले की, घटनेच्या वेळी हा कॉन्स्टेबल सुधारगृहात तैनात होता. गेल्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास सुधारगृहातून 17 अल्पवयीन मुले तेथील पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करून त्यांचे मोबाइल फोन हिसकावून पळून गेले.

प्रवक्त्याने सांगितले की सदर हिसार पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते म्हणाले की विभागीय चौकशीत असे निष्पन्न झाले की कॉन्स्टेबल विनोद आणि रघुविंदर परवानगीशिवाय ड्यूटीवर गैरहजर होते आणि कॉन्स्टेबल विजेंद्रसिंग यांची कर्तव्य सुधारगृहाच्या बाहेर असतानाही ते आत हजर होते.