सावधान ! ‘बुलाती है, मगर जाने का नही’ या शायरीवर TikTok व्हिडिओ बनवणं पडणार महागात, जाणून घ्या कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात चिनी अ‍ॅप टिकटॉकला (Tik Tok) सर्वाधिक पसंती दर्शवली जात आहे. देशातील मोठ्या संख्येने तरुणांना टिकटॉकवर व्हिडिओ तयार करण्याचे प्रचंड वेड लागले आहे. विशेष म्हणजे केवळ तरूणच नाही तर, लहान मुले आणि जेष्ठांचा देखील यात समावेश आहे. ज्या कुणाला आपले कलागुण दाखवायचे असतात ते टिकटॉकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतात. मात्र, एका तरुणाला टिकटॉकवर व्हिडिओ तयार करणे चांगलेच महागात पडले आहे. सध्या टिकटॉकवर ‘बुलाती है, मगर जानेका नही’ या शायरीचा ट्रेन्ड सुरू आहे. याच शायरीवर पिंपरी चिचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांचा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडिओतून पोलिसांची थट्टा करण्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलच्या अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

‘बुलाती है, मगर जानेका नही’ या राहत इंदुरीच्या प्रसिद्ध शायरीने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून अनेकजण या गझलेचा व्हिडिओ तयार करून टिकटॉकवर शेअर करत आहेत. परंतु एका तरुणानं या शायरीवर टिकटॉक करून स्वतःच्या अडचणी वाढवल्या आहेत. हा तरुण पुण्याचा रहिवासी असून त्याने पिंपरी-चिंचवडमधील पोलीस ठाणे किंवा पोलिसांची व्हॅनचे मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून त्याला ‘बुलाती है मगर जाने का नही’ या शायरीचा संवाद जोडला आणि व्हायरल केला. त्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली की काही शेकडो लाईकसाठी पोलिसांची थट्टा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेलकडे सोपवले असून संबंधित व्यक्तीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

सध्या तरुणांमध्ये टिकटॉकवर व्हिडिओ तयार करून सोशल मिडियावर अपलोड करण्याची स्पर्धाच लागली आहे. प्रत्येकाला आपले फॉलोवर्स वाढवायचे असतात. यापेक्षा मी सरस अशी भावना मनात ठेऊन नवनवीन प्रयोग करून, स्टंटबाजी करून लाईक आणि कमेंटसाठी अनेक तरुण वर्ग धोकादायक व्हिडिओ तयार करत असतात. यातच एका तरूणाने आपल्या जीवाची पर्वा न करता धावत्या रेल्वेमधून टिकटॉक व्हिडिओ केला होता त्याला तो खूप महागात पडला होता. यात तो थोडक्यात बचावला होता. या व्हिडिओवर रेल्वे मंत्री पियुष गोयाल यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like