Buldana Accident News | बुलढाण्यात भरधाव ट्रक झोपडीत घुसला, १० मजुरांना चिरडलं, ४ जण जागीच ठार

बुलढाणा : Buldana Accident News | बुलढाण्यात नांदुरा तालुक्यातील वडनेर येथे नांदुरा-मलकापूर मार्गावर ट्रकखाली चिरडले गेल्याने ४ मजूर ठार झाले, तर इतर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव आयशर ट्रक रस्त्यालगतच्या झोपडीत घुसल्याने हा भीषण अपघात झाला. जखमी मजूरांवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून ६ जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. (Buldana Accident News)

कामासाठी आलेल्या मजूरांनी महामार्गाच्या बाजूला झोपडी बांधली होती. यात ते राहत होते. रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना भरधाव आयशर ट्रक झोपडीत शिरला. या अपघात ट्रकखाली सापडल्याने चार मजूर ठार झाले तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. (Buldana Accident News)

प्रकाश बाबू जांभेकर (२६), पंकज तुळशीराम जांभेकर (२६), अभिषेक रमेश जांभेकर (१८) अशी अपघातात मृत झालेल्या तीन मजुरांची नावे आहेत. तर चौथ्या मजुराचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून त्याचे नाव अद्याप समजलेले नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nanded Government Hospital | धक्कादायक! नांदेडमध्ये वेळेत औषधे न मिळाल्याने 24 तासांत 24 रुग्ण दगावले

Rohit Patil On Water Issue | पाणी प्रश्नाबाबत रोहित पाटील म्हणाले – ‘आबांचा जो इतिहास…’

Jayant Patil On Prakash Ambedkar | जयंत पाटलांचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार, म्हणाले – ‘…तर पळून जाऊन लग्न करणं हाच त्यावरचा पर्याय’

Pune Pimpri Chinchwad Crime News | चार सराईत गुन्हेगारांकडून 5 पिस्टल 10 काडतुसे जप्त, पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची कारवाई (Video)