ट्राफिक हवालदारांनी घेतली 50 रुपयांची ‘लाच’ !

पोलिसनामा ऑनलाईन – वाहतूक कर्मचार्‍याने 50 रुपयांची लाच घेतल्यामुळे बुलढाण्यात सर्व वाहतूक शाखेलाच सजा भोगावी लागली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी केलेल्या या कावाईमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी वाहतूक शाखा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

लाचेमुळे जिल्हा पोलीस वाहतूक शाखेची प्रतिमा मालिन झाली होती. त्यामुळे ती प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधिक्षकांनी तात्काळ हा आदेश काढला आहे. पुढील आदेशापर्यंत वाहतूक पोलिसांनी युनिफॉर्म परिधान करू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले असून जिल्ह्यातील चेक पोस्ट ही बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी, अधिकारी मुख्यालयाला संलग्नित केले असून जिल्ह्यातील इतर वाहतूक पोलिसांना पोलीस स्टेशनला जोडण्यात आले आहे.