Buldhana Accident | देवदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांवर घाला ; ट्रकची जीपला धडक, 5 भाविक जागीच ठार, 7 गंभीर जखमी

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Buldhana Accident | शेगाव (Shegaon) येथे संत गजानन महाराजांच्या (Sant Gajanan Maharaj) दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या जीपला ट्रकने दिलेल्या (Jeep – Truck Accident) धडकेमुळे झालेल्या अपघातात ५ जण जागीच ठार (Death) झाले असून ७ जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत (Buldhana Accident).

 

ही घटना देऊळगाव राजा शहराबाहेरील वळणावर सोमवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंबड (Ambad) तालुक्यातील रोहनवाडी (Rohanwadi) येथील भाविक जीपमधून शेगावला जात होते.

 

रोहनवाडी येथील भाविक बोलेरो जीपमधून (Bolero Jeep) शेगावकडे जात होते. देऊळगाव राजा (Deulgaon Raja) शहराबाहेरील बायपासच्या (Bypass) वळणावर समोरुन येणार्‍या मालट्रकने या जीपला जोरात धडक (Buldhana Accident) दिली. ही धडक इतकी जोरात होती की, त्यात जीपमधील ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. जीपमधील ७ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जालना येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. जखमींना अगोदर ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) पाठविण्यात आले होते. अपघातात मृत्यु पावलेल्यांची ओळख पटविण्यात येत आहे.

 

Web Title :- Buldhana Accident | buldhana accident news 5 killed in jeep car accident while 7 are injured

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा