Buldhana Crime | मोबाईलवर गेम खेळण्यास आई-वडिलांनी केला विरोध; 16 वर्षीय मुलानं थेट केलं हे ‘कृत्य’

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Buldhana Crime | बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव (Buldhana Crime) येथील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाइलमध्ये गेम (Mobile Game) खेळू नको म्हणून खवळल्याने एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या (suicide) केली आहे. त्या मुलाला आई-वडिलांनी मोबाइलमध्ये गेम खेळू नको म्हणून हटकले होते. या कारणावरुन रागावलेल्या मुलाने थेट टोकाचं पाऊल उचलंल आहे. घरातून निघून जाऊन शेजारी असलेल्या विहिरीत त्याने उडी घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या काळात राज्यात शाळेला कुलूप लागलं. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षणाऐवजी मोबाईलवर ऑनलाइन शिक्षण देण्यास अधिक प्राधान्य वाढलं. मात्र, अभ्यासाऐवजी मुलाचं लक्ष मोबाईलमध्ये गुंतलं. काही मुलं मोबाईलच्या आहारी गेल्याने अनेक धक्कादायक घटना देखील उघडकीस आल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे महत्वाचे म्हणजे ऑनलाइन शिक्षण हे अधिक धोकादायक तर बनत नाही ना…असा एक प्रश्न निर्माण होतो आहे. दरम्यान, खामगाव येथील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या मुलाने केलेल्या आत्महत्यामुळे आई-वडिलांच्या डोक्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. (Buldhana Crime)

Web Title :- Buldhana Crime | 16 year old child suicide after parents stop him to play mobile game buldhana district

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Letter | दोन बालकांनी पीएम मोदी आणि सीएमला लिहिले ‘हे’ क्यूट पत्र, सांगितल्या आपल्या अडचणी

Health Insurance Claim Tips | हेल्थ इन्शुरन्स क्लेम करताना ‘या’ 9 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात; जाणून घ्या

IAS-IPS | अवघ्या 75 कुटुंबाच्या ‘या’ गावात प्रत्येक घरात एक IAS किंवा IPS अधिकारी, जाणून घ्या विशेष गावाबद्दल