बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Buldhana Crime News | राज्यात दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचारांमध्ये (Crime Against Woman) वाढ होताना दिसत आहे. अशीच एक अत्याचाराची घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली (Chikhali News) या ठिकाणी घडली आहे. यामध्ये काकानेच आपल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार (Buldhana Minor Girl Rape Case) केले आहेत. या घटनेमुळे परिसरात सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी काका आणि पुतणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. नराधम काकाने आपल्या 15 वर्षीय पुतणीला गाडीवर बसवून बुलडाणा येथे नेले. त्या ठिकाणी त्याने एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केले. यानंतर पीडित मुलीला त्याने घरी सोडले. घरी आल्यानंतर घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने त्या नराधम काका विरुद्ध चिखली पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर चिखली पोलिसांनी आरोपी नराधम काकावर बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली. (Buldhana Minor Girl Rape Case)
Web Title :- Buldhana Crime News | buldhana rape case uncle abused nephew incidents in buldhana district chikhali crime news
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Chinchwad Bypoll Elections 2023 | देवेंद्र फडणवीस यांची जगताप कुटुंबियांच्या घरी अचानक भेट; भेटीमुळे चर्चांना उधान
- Pune Crime News | दत्तवाडीतील जूगार अड्ड्यावर छापा; १५ जणांवर गुन्हा दाखल
- Pune Crime News | महापालिकेची कारवाई टाळण्यासाठी २ लाखांची खंडणी मागणारे जाळ्यात; हॉटेल व्यावसायिकाला देत होते जीवे मारण्याची धमकी