Buldhana Crime News | शेतीच्या पैशावरुन झालेल्या वादातून वृद्ध शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Buldhana Crime News | बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही वेळा शेतकऱ्याला आपल्याकडे जमीन कमी असली कि स्वतःची पोटाची खळगी भरण्याकरता बटाईने (शेतीचा खर्च दोघं सारखं करतात आणि उत्पन्न देखील दोघांना सारखं मिळतं) इतरांच्या शेतामध्ये काम करावे लागते. या बटाईच्या पैशातून कधी कधी वाद होतात. अशीच एक घटना बुलढाणा या ठिकाणी घडली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने पैशांच्या वादातून आत्महत्या (Suicide) केली आहे. (Buldhana Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शिराढोण येथील बटाईच्या पैशांची वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने एका शेतकऱ्याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मृत शेतकऱ्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी जो शेतकरी शेती बटाई करत होता त्या शेतकऱ्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी कि, शिराढोण येथील रहिवासी रवींद्र विष्णू इखारे आणि प्रकाश प्रल्हाद राणे हे गेल्या सात वर्षांपासून अकरा एकर शेती बटाई करत होते.
दोघांमध्ये शेतीसाठीचा खर्च व उत्पन्न निम्मे निम्मे असा करार झाला होता.
12 फेब्रुवारी रोजी रवींद्र इखारे यांच्याकडे त्यांचे मेहुणे प्रवीण झनके आले होते.
त्यामुळे त्यांनी मलकापूर येथील चिमणलाल छगनलाल या दुकानातून 2400 रुपयांचा किराणा उचलला.
यानंतर रवींद्र इखारे यांनी गावात जाऊन प्रकाश राणे यांना पैशाची मागणी केली.
त्यांनी पैसे न देता शिवीगाळ करून धमक्या दिल्या.
हि गोष्ट सहन न झाल्याने इखारे यांनी यांनी राणे यांच्या दारासमोर 12 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता विष पिऊन आत्महत्या केली. (Buldhana Crime News)

यानंतर इखारे यांना तातडीने मलकापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मृत इखारे यांची पत्नी मीना इखारे यांनी गुरुवारी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी राणे यांच्या विरुद्ध रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त करणे व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title :- Buldhana Crime News | farmer has ended his life in malkapur taluka of buldhana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagpur Crime News | एका शुल्लक कारणावरून पतीने केली पत्नीची हत्या मग स्वतःदेखील केली आत्महत्या; नागपूरमधील घटना

Mumbai Crime News | धक्कादायक ! पनवेलमध्ये लेकीसोबत बापानेच केले दुष्कर्म; मुलीच्या पोटात दुखू लागल्याने झाले उघड

Pune Crime News | मुलींच्या वसतीगृहात जाण्यास मनाई केल्याने टोळक्याने दांडक्याने केली मारहाण

Aurangabad Crime News | नववधूने लग्नाच्या 6 दिवसांनंतर सासरच्या माणसाच्या हातावर तुरी देत केले पलायन; औरंगाबादमधील घटना