Buldhana Crime News | गहू साफ करण्याच्या मशीनमध्ये गळ्यातील रुमाल अडकल्याने फास लागून शेतकरी महिलेचा मृत्यू

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Buldhana Crime News | आपण आपला भार हलका करण्यासाठी कधी कधी आधुनिक यंत्रणाचा वापर करत असतो. मात्र कधी कधी हे यंत्र हाताळण्यात आपण हलगर्जीपणा करतो आणि तो आपल्या अंगलट येतो. यामुळे अनेकदा आपल्याला जीवदेखील गमवावा लागतो. अशीच एक घटना बुलढाणामध्ये (Buldhana Crime News) घडली आहे. यामध्ये एक चूक शेतकरी महिलेच्या जीवावर बेतली आहे. गळ्याला गुंडाळलेला रुमाल गहू साफ करण्याच्या फिल्टर मशीनमध्ये अडकल्याने एका विवाहित महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथील शेतकरी तुळशीराम शेवाळे (Tulshiram Shewale) व त्यांच्या पत्नी शांताबाई (Shantabai Shewale), आणि त्यांचा मुलगा हे घरच्या शेतात गहू स्वच्छ करण्याच्या फिल्टर मशीनवर काम करत होते. यादरम्यान गहू स्वच्छ करीत असताना शांताबाई शेवाळे यांच्या गळ्याला गुंडाळलेला रुमाल अचानक मशीनमध्ये अडकला आणि त्यांना जोराचा फास बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Buldhana Crime News)

या घटनेमुळे संपूर्ण सिंदखेडराजा शहरामध्ये शोककळा पसरली आहे. मृत शांताबाई शेवाळे यांच्या माघारी पती व
दोन मुले असा परिवार आहे. आपल्या एका छोट्याशा चुकीमुळे महिलेचा जीव गेल्याने परिसरामध्ये एकच
खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतात काम करत असताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहे.

Web Title :- Buldhana Crime News | farmer lady dies after neck towel stuck in wheat cleaning filter machine in sindkhedraja

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Minister Sanjay Rathod |औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

Beed Accident News | काळाने केला घात! परीक्षेला जाताना वाहनाने दिलेल्या धडकेत बाईकस्वार तरुणाचा मृत्यू