बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Buldhana Crime News | बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 50 वर्षीय नराधम आरोपीकडून एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Minor Girl Rape Case) करण्यात आला आहे. गुंगीचे औषध देऊन आरोपीने हे संतापजनक कृत्य केले आहे. या प्रकरणी मुलीने शेगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, पोस्को कायदा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Buldhana Crime News)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
गणेश शेजाळे असे या प्रकरणातील आरोपी नराधमाचे नाव आहे. या आरोपीने 15 वर्षीय पीडित मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. यानंतर पीडितेने आरोपीकडून कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि थेट शेगाव पोलीस स्टेशन गाठून आरोपी गणेश शेजाळे विरुद्ध बलात्कार सह पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Buldhana Crime News)
या घटनेमुळं पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महिलांसाठी एवढे कायदे कानून करूनसुद्धा अजूनही काही ठिकाणी महिला या आरोपींच्या वासनेला बळी पडत आहेत.
त्यामुळे आरोपींवर वचक बसण्यासाठी शिक्षा अजून कठोर करण्याची आवश्यकता आहे.
Web Title :- Buldhana Crime News | minor girl raped by 50 yr old man in buldhana case file against him
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update