Buldhana Crime News | वाळू उपसा करणाऱ्या भरधाव टिप्परची दुचाकीस्वाराला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Buldhana Crime News | बुलढाण्यामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वाराला जागीच जीव गमवावा लागला आहे. यामध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या एका भरधाव टिप्परने या दुचाकीस्वाराला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. दुर्दैवाने या अपघातात त्या दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला आहे. वाळू माफियांचे काम हे रात्रीच्या वेळी सुरु होते. अवैधरित्या वाळू उपसा करून बांधकामापर्यंत ते रात्रीचा दिवस करतात. कमी वेळेत त्यांना हे काम पार पाडायचे असतात. त्यामुळे ग्रामीण भागातून नदीकाठी ते शहरापर्यंत यांच्या टिप्पर गाड्या वेगाने धावत असतात. याचदरम्यान हा भीषण अपघात झाला आहे. (Buldhana Crime News)

काय घडले नेमके?
मलकापूर तालुक्यातील बेलाड येथून दुचाकीवर घीर्णीकडे जात असलेल्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने जोरात धडक दिली. या धडकेनं दुचाकीस्वार खाली पडला आणि त्याच्या डोक्यावरून त्या टिप्परचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीवरील बाकी दोघेजण गंभीर जखमी झाले. काल रात्री पावणे नऊच्या दरम्यान हा अपघात झाला. बुलढाणा जिह्यातील घीर्णी या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. (Buldhana Crime News)

सविस्तर माहिती अशी कि, मौजे बेलाड येथील प्रदीप भरत निंबोळकर (वय 25), बळीराम भरत निंबोळकर
(वय 22 ) आणि गजानन त्रंबक सबारे (वय 32) सर्व रा. बेलाड. हे तिघं दुचाकी क्रमांक एमएच 14 जेडी 8984
ने गिरणीकडे जात होते. तेवढ्यात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमपी 09 एचजे 5055 ने
त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत प्रदीप भरत निंबोळकर हा खाली पडला आणि त्याच्या
डोक्यावरून टिप्परचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
बळीराम भरत निंबोळकर आणि गजानन त्रंबक संबारे हे दोघेजण या अपघातात गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली.

Web Title :- Buldhana Crime News | one dies in an accident between a tipper and a two wheeler at buldhana malkapur