Buldhana Crime News | घृणास्पद ! बुलढाण्याच्या मिलिटरी स्कूलमधील शिक्षकाचा दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Buldhana Crime News | बुलढाणा तालुक्यातील कोलवड शिवार परिसरातील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये एक घृणास्पद प्रकार घडला आहे. यामध्ये नराधम शिक्षकाचा दोन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केले आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित नराधम शिक्षकाविरुद्ध ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तो फरार झाला आहे. (Buldhana Crime News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित विद्यार्थी हे 10 वीच्या वर्गात अजिंठा मार्गावरील कोलवडनजीकच्या राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. ते दोघेही वसतिगृहात राहतात. धर्मेंद्र उत्तम हिवाळे असे दुष्क्रुत्य करणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. ते विज्ञान विषय शिकवत होते. या विकृत शिक्षकाने प्रात्यक्षिकमध्ये कमी गुण देण्याची धमकी देत या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केले आहेत. (Buldhana Crime News)

या विद्यार्थ्यांनी या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीनुसार सदर शिक्षकावर ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्यावर बुलढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी धर्मेंद्र हिवाळे हा फरार झाला आहे.
पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title :- Buldhana Crime News | two students were assaulted by a teacher in kolwad shivar area of buldhana taluka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik ACB Trap | 40 हजारांची लाच घेताना भूमी अभिलेखचा लिपिक ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | विमानाने पुण्यात येऊन महागडे फोन चोरणारी आंतरराज्यीय टोळी विमानतळ पोलिसांकडून गजाआड, 30 लाखांचे मोबाईल जप्त

Aaditya Thackeray | सहा महिन्यात बारावे कारण दिलंय, तरीही ते गद्दारच!, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला