Buldhana Crime | ‘ती मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते’ म्हणून विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ पाऊल

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Buldhana Crime | बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विद्यार्थ्याने वर्गाच्या खोलीतील सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्याने प्रेम प्रकरणातून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. या मृत मुलाच्या मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट आढळून आली. या नोटमध्ये ‘एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Buldhana Crime)

 

काय आहे नेमके प्रकरण?
बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर या महाविद्यालयामध्ये हि घटना घडली आहे. सूरज रामकृष्ण गावंडे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो जळगाव जामोद तालुक्यातील येणंगाव या ठिकाणचा रहिवाशी होता. त्याने महाविद्यालयाच्या वर्ग खोलीतच सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. काल संध्याकाळी ही घटना सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना तसंच पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली.

पोलिसांकडून तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्यांना मृतदेहाच्या शेजारी एक सुसाईड नोट आढळून आली. या सुसाईड नोटमध्ये “एक मुलगी माझ्याशी न बोलता इतर मुलांशी बोलते…!” असे लिहिले होते. त्यामुळे प्रेम प्रकरणातून आलेल्या नैराश्यामुळे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

 

Web Title :- Buldhana Crime | student commits suicide in college by writing suicide note

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | बलात्काराची तक्रार दिल्याने तरुणाचा अल्पवयीन युवतीच्या घरासमोर धिंगाणा; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime News | साध्या कणकणीवर डॉक्टरांकडून उपचार करुन घेणे बेतले जीवावर; दोघा डॉक्टरांसह परिचारिकांवर गुन्हा दाखल

Narayan Rane | नारायण राणे आणि पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची, म्हणाले-‘तुम्ही पत्रकार नसून शिवसेनेचे प्रवक्ते’

Pune Traffic Update News | पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकले खुद्द पोलीस अधिकारी, 2 किमीच्या अंतरासाठी लागला दीड तास

Lions Senior Trophy T-20 | लायन सागर ढोमसे स्मृतीप्रित्यर्थ ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२३ स्पर्धेचे २ फेब्रुवारीपासून आयोजन !