Buldhana Crime | DJ बंद करायला सांगितल्याने पोलीस स्टेशनमध्येच राडा अन् तोडफोड; ठाणे अंमलदार जखमी, दोन महिलांसह 6 जणांवर FIR

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – Buldhana Crime | वाढदिवसानिमित्त (Birthday) मध्यरात्री 1 वाजल्यानंतरही सुरु असलेला डिजे (DJ) बंद करायला सांगितल्याच्या कारणावरून जमावाने पोलीस ठाण्यात (Police Station) शिरुन तेथील खुर्च्यां, टेबलाची फेकाफेक करुन तोडफोड केली आहे. हा प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana Crime) शेगावातील विश्वनाथ नगरमधील (Vishwanath Nagar Shegaon) शहर पोलीस ठाण्यात (City Police Station) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला.

 

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे (API Gautam Ingle) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार झाडेगाव येथील बळवंत चिंतामण बाभूळकर (वय 31), भारत अर्जुन बाभूळकर, नरेश अर्जुन बाभूळकर (रा. विश्वनाथनगर), सुनील बाबुराव खंडेराव (वय 30, रा. कारंजा, रमजानपूर) यांच्यासह दोन महिलांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Buldhana Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेगावातील विश्वनाथनगर भागात मध्यरात्रीनंतरही डिजे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे हे सहकार्‍यांसह विश्वनाथनगरमध्ये गेले.
त्यावेळी त्यांनी संबंधितांना डीजे बंद करायला सांगितले.
पोलीस गेल्यावर त्यांनी पुन्हा डिजे सुरु केला. त्याची तक्रार पुन्हा पोलीस ठाण्यात आली.
तेव्हा मध्यरात्री सव्वा एक वाजता पोलीस पुन्हा घटनास्थळी गेले. त्यांनी एकाला ताब्यात (Arrest) घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर 5 ते 6 जण पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पोलिसांशी वादावादी केली. स्टेशनमधील ठाणे अंमलदार यांना धक्काबुक्की केली. तसेच टेबल खुर्च्यांची फेकाफेकी करुन तोडफोड केली. या घटनेत ठाणे अंमलदारांच्या खांद्याला मार लागला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

 

Web Title :- Buldhana Crime | vandalism in police station after asked to stop DJ system Buldhana police officer injured FIR on 6 persons including two women

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा