बुलढाणा : जिल्हयातील नगराध्यक्षाच्या डॉक्टर पतीसह दोघे 80 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बुलढाणा जिल्ह्यातील एका नगराध्यक्षाच्या डॉक्टर पतीसह दोघांना 80 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. पालिकेत वारसाहक्काने सफाई कामगार म्हणून नोकरीस लावण्यासाठी नगराध्यक्ष असणाऱ्या पत्नीला ठराव मंजूर करण्यास लावत नोकरी लावण्यासाठी लाच घेतली आहे. नगराध्यक्षाच्या पतीलाच लाच घेताना पकडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

डॉ.रामदास शामराव शिंदे (वय 61) व प्रवीण भागीरथ बन्सीले (वय 49) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांचे डॉ. रामदास शिंदे यांचे पती आहेत. तर प्रवीण हा डॉ. शिंदे यांचा पर्सनल असिस्टंट आहे. दरम्यान यातील तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीस वारसहक्काने नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून नोकरीस लावण्यासाठी डॉ. शिंदे यांनी पत्नी नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांना सांगून ठराव घेऊन ठरावात नाव टाकण्याकरिता 80 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत त्यांनी अमरावती एसीबीकडे तक्रार केली होती. त्याबाबत एसीबीने याची पडताळणी केली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज पथकाने दोघांना तक्रारदार यांच्याकडून तडजोडीअंती 80 हजार रुपयांची लाच स्वीकारली आहे. त्यानूसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पुढील कारवाई बुलढाणा लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

अमरावती लाच लुचपत परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई उपअधीक्षक आर.एन. मळघणे व त्यांच्या पथकातील सुनील राऊत, रवींद्र दळवी, विनोद लोखंडे, विजय मेहेत्रे, स्वाती वाणी यांच्या पथकाने केली आहे.