बुलढण्यातील खामगावात दगडाने ठेचून दोघा तरुणाचा खून, सर्वत्र खळबळ

खामगाव : पोलीसनामा ऑनलाइन – खामगाव शहरात मध्यरात्री दोन तरुणांवर चाकूने वार करुन आणि दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्याची घटना उघडकीस आले आहे. विशाल देशमुख (वय ३२) आणि सचिन पवार (वय ३३) अशी या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरुन एकाला ताब्यात घेतले आहे.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घाटपुरी नाका भागात मध्यरात्री २ वाजता हा प्रकार घडला. अवैध सावकारी आणि दोन गटातील वादातून या हत्याच्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घाटपुरी नाका भागात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोघे तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.

त्यानंतर शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. मात्र, त्यांचा अगोदरच मृत्यु झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट दिली असून संशयावरुन एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/