जबरी चोर्‍या करणार्‍यांच्या बुलढाणा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन

ट्रक अडवुन जबरी चोरी करणार्‍यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी रात्री गस्तीवर असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपींनी गुन्हयात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली असुन, याप्रकरणी ट्रक चालक राजेंद्र सुरजमल चौधरी (26, रा. नसिराबाद, जि. अजमेर, राजस्थान) यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e8fc68f6-c976-11e8-9cc8-951bc641fc25′]

ज्ञानेश्‍वर रामदास काळे (23, रा. तिर्थपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना) आणि संदीप चंद्रभान गायकवाड (25, रा. मंडपगाव, ता. देऊळगावराजा जि. बुलढाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटकेतील आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी. महामुनी, पोलिस उपनिरीक्षक देशमुख, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक देशमुख, कर्मचारी राजेंद्र सानप, सतीश राठोड हे सरकारी वाहनाने बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एक ट्रक थांबला होता. पोलिस उपविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी आणि पथक हे बोराखेडीकडे जात होते. त्यांना एक लाल रंगाची पल्सर वेगाने ओव्हरटेक करून मलकापुरकडे गेली. पोलिस पथकाला संशय आल्याने त्यांनी झडप घालुन आरोपींना अटक केली.

गुन्हे शाखेने अट्टल वाहन चोरांच्या आवळल्या मुसक्या, २० दुचाकी जप्त

आरोपींकडून काही घातक हत्यारे जप्‍त करण्यात आली. आरोपी हे ट्रक चालकास धमकावुन त्यास हत्याराचा धाक दाखवुन लुटण्याच्या तयारीत होते. पोलिस पथकाने वेळीच त्यांना बेडया ठोकल्या. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात भादंवि 393, 34 आणि आर्म अ‍ॅक्ट 3,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अविनाश भामरे हे करीत आहेत. पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. अटक आरोपी हे सराईत आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत काय याचा तपास पोलिस निरीक्षक अविनाश भामरे हे करीत आहेत.

[amazon_link asins=’B015SW7FV6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fccb35af-c976-11e8-8f4d-659519c7a7f4′]