राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे बुलढाणा जिल्हयातील 6 वे कॅबीनेट मंत्री

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला गेला. या मंत्रिमंडळात सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातून पाचव्यांदा आमदार झालेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणारे ते सहावे नेते ठरले.

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद बुलडाणा जिल्ह्यात तशी बऱ्या पैकी आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पाहिले जाते. तसेच आता शरद पवार विदर्भात आपली ताकद वाढवू इच्छित आहेत. त्यामुळे शिंगणेंचे मंत्रिपद जवळपास निश्चितच होते. यापूर्वी शिंगणेंना राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री म्हणून जवळपास 10 वर्ष कामाचा अनुभव आहे.

शपथविधीला सिंदखेडचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आता उत्सुकता आहे की शिंगणेंना कोणते मंत्रिपद मिळणार. शिंगणे पहिल्यांदा 1995 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आहे होते. 2014 वगळता त्यांना कायम मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. 2009 आणि 2019 साली त्यांचा लोकसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. दोन्ही वेळा ते विधानसभा निवडणूकीत विजयी होऊन त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.

बुलडाणा जिल्ह्यास एकाच वर्षात दोनदा कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याचा योग हा 2019 मध्ये आहे. जून जुलै दरम्यान भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी कामगारमंत्रीपद मिळाले होते. आता ते पुन्हा निवडून आले. परंतु भाजपची सत्ता गेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसशी निष्ठावान राहिल्या शिंगणेंना मंत्रिपदाची मोठी संधी मिळाली. बुलढाणा जिल्ह्याला 59 वर्षाच्या इतिहासात उपमंत्री ते कॅबिनेट मंत्रीपद असून एकूण दहा जणांनी ही पदे भूषवली आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/