Buldhana RTO | मोटार वाहन निरीक्षक लाच घेतायत की दंड वसूल करतायत? ‘या’ व्हिडिओवरून सत्य आलं समोर

बुलडाणा न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  Buldhana RTO | एका मोटार वाहन निरीक्षकाचा (Motor Vehicle Inspector) वाहन चालकांकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ (Video) प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्याचं समोर आलं आहे. परंतु, मोटार वाहन निरीक्षकांनी घेतलेले पैसे, ते लाच नाही तर वाहनाला चलन करून आकारण्यात आलेल्या दंडाची (Penalty) पावती आहे. ते मोटार वाहन निरीक्षक बुलढाणा (Buldhana RTO) जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात (RTO) कार्यरत आहेत. असा पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल करणे म्हणजे हा उद्धटपणा आणि सर्व नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.

राजेंद्र निकम (Rajendra Nikam) असं मोटार वाहन निरीक्षकाचे नाव आहे.
तर,आमच्या खात्याची प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या चालकाचा निषेध बुलडाणा RTO गोपाल वरोकार यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिरते वाहन तपासणी पथकामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम (Vehicle Inspector Rajendra Nikam) हे कर्तव्यांवर होते.
तेव्हा (6 ऑगस्ट) रोजी दुपारी 12 च्या दरम्यान वाहन तपासणी वेळी त्यांनी MH. 28 H .8036 नंबरची 3 चाकी मालवाहू ऑटो रिक्षा तपासणी केली.
त्यावेळी त्याच्याकडे फिटनेस, इंशोरन्स, परवाना, रिफ्लेक्टर आणि PUC चे कोणतेही कागदपत्रे न्हवती. दरम्यान, ऑटो रिक्षा धारक शेख रहेमान याला मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम (Rajendra Nikam) यांनी सदर ऑटो रिक्षाला (Auto rickshaw) चलन करीत 9 हजार 700 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 

9 हजार 700 रुपयाचा ठोठावलेला दंड ऑटो रिक्षा (Auto rickshaw) चालकाने निकम यांच्याकडे भरले. त्यावेळी निकम यांनी पैसे भरून घेतले.
दरम्यान, दंड भरतेवेळी पैसे मोजत असल्यावर आणि मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम (Vehicle Inspector Rajendra Nikam) यांना पैसे देत असल्यावर केंद्र करीत व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला गेला.
तर, हा व्हिडीओ पाहणाऱ्याला वाटतो की, मोटार वाहन निरीक्षक लाचेचे पैसे घेत आहे.
म्हणून हा उद्धटपणा आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल केली जाते.
याबाबत RTO गोपाल वरोकार (Gopal Warokar) म्हणाले की, नियमाने काम करीत असतांना व्हिडीओ व्हायरल केल्याबाबतीत निश्चितच हा प्रकार विभागाच्या समोर, वरिष्ठांच्या समोर ठेवू, त्यांच्याकडण तसे निर्देश प्राप्त होतील.
त्यानुसार त्या चालकांवर आम्ही कारवाई (Action) करू असं त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Buldhana RTO | video of buldana motor vehicle inspector taking money goes viral

Hair Problems | कोंडा, गळणाऱ्या केसांनी त्रस्त आहात तर वापरा होममेड हेअर मास्क; जाणून घ्या

Crime News | महिलेचा राडा ! मास्क न घातल्याने आडवणार्‍या पोलिसाला केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पहा Video

Bhusawal News | भाजप नगरसेवक राजकुमार खरातसह 5 जण 2 वर्षासाठी तडीपार, राजकीय वर्तुळात खळबळ