Buldhana Suicide News | बुलढाण्यात रँगिगला कंटाळून ITI च्या विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ पाऊल

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाईन – Buldhana Suicide News | बुलढाण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ITI च्या विद्यार्थ्याने रॅगिंगला (Student Raging Case) कंटाळून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. एका ऑडिओ क्लिपमुळे हे सगळे प्रकरण बाहेर आले आहे. या प्रकरणी 5 जणांवर रॅगिंगचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामधील 4 जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Buldhana Suicide News)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून एका ITI मध्ये शिकणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थ्यांचे नाव कैलास गायकवाड (Kailash Gaikwad) असे आहे. त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झाले नसल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. (Buldhana Suicide News)

मृत कैलास गायकवाड याने आत्महत्या करण्याच्या अगोदर त्याने आपल्या मामाला वस्तीगृहावर विद्यार्थी आपले कपडे काढून रॅगिंग करत असल्याचे सांगितले होते. तसेच शिक्षकही विनाकारण शिवीगाळ करत असल्याचे सांगितले होते. हि ऑडिओ क्लिप समोर आल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. यामध्ये तो आपल्याला होणार त्रास आपल्या मामाला सांगत आहे. हि ऑडिओ क्लीप समोर आल्यानंतर या क्लिपच्या माध्यमातून पोलिसांनी तब्बल पाच जणांवर रॅगिंगचे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तीन विद्यार्थ्यांसह वस्तीगृह गृहपाल आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणार पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांसह वसतीगृह गृहपालदेखील अटक केली आहे. तसेच या घटनेच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Web Title :- Buldhana Suicide News | 18 year iti student killed himself after ragging molestation in buldana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

BJP MLA Ashish Shelar | ‘आजही शेठजी उद्धव ठाकरेंचं लक्ष ठेकेदारांचे पैसे परत देण्यावर’, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?