Bulk Drug Park | रायगड जिल्ह्यात उभारणार बल्क ड्रग पार्क’, 75 हजार भूमिपुत्रांना मिळणार रोजगार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  रायगड (Raigad) जिल्ह्यात ‘बल्क ड्रग पार्क ‘(Bulk drug park) ची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) पुढाकार घेतला आहे. 30 हजार कोटींच्या या प्रकल्पाची उभारणी करण्यापूर्वी तेथील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जागेला योग्य दर दिला असून विकसित केलेल्या जागेचा देखील 10 टक्के भाग जमिनीच्या स्थानिक मालकांना परत देण्यात येईल, असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घेतला आहे. Bulk Drug Park | take locals into confidence to develop bulk drug park says cm uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

देशातील औषध निर्मिती क्षेत्रासाठीही ‘बल्क ड्रग पार्क ‘ (Bulk drug park) हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा या तालुक्यांतील 17 गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे.
यामध्ये कोणत्याही गावाचे स्थलांतर होणार नाही.
स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणारा 30 हजार कोटी गुंतवणुकीचा तसेच जवळपास 75 हजार लोकांसाठी रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प आहे.
याबाबत निर्णय गुरुवारी घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले की, याठिकाणी उभारल्या जाणाऱ्या प्रोजेक्ट्मधे भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा.
या प्रोजेक्टमध्ये नोकरीची संधी देखील मिळेल.
तसंच या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या कामगारांचे कौशल्य वाढवण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स देखील उभारले जातील, प्रत्यक्ष जमिनीवरचे सर्वेक्षण व्हावे.
शक्य असेल तिथे बागायतीचे संरक्षण व्हावे आणि स्थानिकांना सर्वोत्तम मोबदला मिळेल यासाठीचा सर्वंकष आराखडा तयार करून स्थानिकांशी चर्चा करून या प्रकल्पाची आखणी करावी.
अशा महत्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत.
या बैठकीदरम्यान उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare), आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi), उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंग (Baldev Singh), एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन (P. Anbalgan), रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी (Nidhi Chaudhary) यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी सुभाष देसाई (Subhash Desai) म्हणाले, देशातील औषध निर्माण उद्यानांचा विकास या अंतर्गत हा प्रोजेक्ट उभा राहावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.
भूसंपादनाच्या मोबदल्या शिवाय पीएपीसाठी 10 टक्के विकसित भूखंड देण्यात येईल.
भूखंडाचा वापर व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी वापराकरिता करता येऊ शकेल.
त्यामुळे उद्योग आणि व्यवसायातून तसेच निवासी गाळे बांधून भाड्याने देता येतील व प्रकल्पग्रस्तांना कायम स्वरूपाचे उत्पन्न निर्माण होणार आहे.
असे देसाई (Subhash Desai) यांनी सांगितले आहे.

Web Title : Bulk Drug Park | take locals into confidence to develop bulk drug park says cm uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?’