बैलगाडा शर्य़ती भरविल्याप्रकरणी खेड तालुक्यातील 5 जणांवर FIR दाखल

राजगुरुनगर: पोलीसनामा ऑनलाईन – न्यायालयीन बंदी झुगारून तिन्हेवाडी (ता. खेड ) येथे घाटात बैलगाडा शर्यती भरविल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरूण राघू थिगळे , निलेश चंद्रकांत पाठरे , धोंडीभाऊ बबन आरूडे ,संतोष शिवाजी आरुडे, नानाभाऊ सहादु आरुडे ( सर्व रा. तिन्हेवाडी ता. खेड ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शेखर चिमणा भोईर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथे रविवारी (दि. 22 ) न्यायालनाने घातलेली बैलगाडा शर्यतीवरील बंदी झुगारुन बैलगाडे सकाळी 7 वाजल्यापासुन पळविण्यात येत होते. या शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा मालक आणि शौकीनांनी घाटात मोठी गर्दी केली होती. मात्र याची कुणकुण लागताच खेड पोलिसांनी घाटात जाऊन शर्य़ती सुरु असलेल्या बंद केल्या. प्राण्यांना निर्दयीपणे वागवुन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन नियमांचे उल्लघन करून बैलगाडा घाटात गर्दी जमविल्याबद्दल संबधितावर गुन्हा दाखल केला आहे.