शेतकऱ्याने बैलगाडा आणि बैल न्यायालयीन लढा लढवून परत मिळविला 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – रेल्वे सुरक्षा दलाने एका प्रकरणात जप्त केलेला बैलगाडा आणि बैल शेतकऱ्याने न्यायालयीन लढा लढवून परत मिळविला. या बैलगाड्यावर त्याची उपजिविका सुरू होती. हा बैलगाडा भाड्याने दिल्यावर रेल्वेचे लोखंड चोरून त्याची वाहतुक करण्यात येत होती. पुणे येथील रेल्वेचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम.एम. राऊत यांनी याबाबतचा आदेश दिला.

नेताजी महादेव बंडगर (वय 37, रा. मिरज, जि. सांगली) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. बंडगर यांनी 2 जानेवारी रोजी बैलगाडा भाड्याने दिला होता. त्यावेळी तिघांना त्या बैलगाडातून रेल्वेची संपत्ती चोरताना अटक करण्यात आली. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी बैलगाडा आणि बैल जप्त केला होता. त्यामुळे बैल, बैलगाडा परत मिळावा, यासाठी बंडगर याने ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत येथील न्यायालयात धाव घेतली. जप्त केलेल्या बैलाला चांगल्या परिस्थितीत ठेवायची सोय रेल्वे प्रशासनाकडे नाही. रेल्वे प्रशासन प्राणी कसे काय जप्त करू शकते. बैलाचा मूळ मालक बंडगर हे आरोपी नाहीत. भाड्याने देताना चोरीच्या कामासाठी बैलगाडा वापरण्यात येणार असल्याची माहिती त्यांना नव्हती. त्यांची त्या बैलगाडावर उपजिविका आहे. दैनदिन उत्पन्न त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जप्त केलेला बैल आणि बैलगाडा सोडण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली.

यावर आदेश करत न्यायालयाने बैल, बैलगाडा सोडण्याचा आदेश दिला. याविषयी श्रीकृष्ण घुगे म्हणाले, बैल ही वस्तु नाही, प्राणी आहे. त्यामुळे त्यांना जप्त करणे योग्य नाही. बैलाचे संगोपण करावे लागते. वेळेला चारा, पाणी द्यावे लागते. अन्यथा त्याच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्याला मिरज येथून पुणे येथे येऊन बैल, बैलगाडा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like