Bullock Cart Race Nagar | अहमदनगरच्या मलकापूरला बैलगाडा शर्यत आयोजित करणार्‍या जुन्नरमधील 6 जणांना अटक

अहमदनगर : Bullock Cart Race Nagar | राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी असताना संगमनेर (Sangamner) तालुक्यातील कौठे मलकापूर (Malakapur) शिवारात बैलगाडा शर्यतीचे (Bullock Cart Race Nagar) आयोजन करणार्‍या जुन्नर (Junnar) तालुक्यात 6 जणांना घारगाव पोलिसांनी (Ghargaon Police) अटक केली आहे.  पोलिसांनी 47 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कौठे मलकापूर येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आणि त्यात सहभागी होणार्‍यांमध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लोकांचा सहभाग अधिक होता.

शिवाजी रामभाऊ कारंडे (वय 53), सचिन उत्तम पानसरे (वय 26, रा. ओतूर, ता. जुन्नर), नितीन उत्तम पावडे (वय 38, रा. पाचघर, ता. जुन्नर ), नितीन उत्तम धोंडकर (वय 22, रा. पाचघर, ता. जुन्नर), अक्षय बबन डुबरे (वय 26, रा. ओतूर ), श्रीकांत बाळु मंडलिक( वय 27, रा. डिंगोर , ता. जुन्नर) अशी या सहा जणांची नावे आहेत.

Pune News | पानशेत धरणात कार बुडून पुण्याच्या शनिवार पेठेतील समृध्दी देशपांडेचा मृत्यू; पती आणि मुलगा थोडक्यात बचावले

कोरोना प्रादुभार्वामुळे जमावबंदी व शर्यतीवरील बंदीचे नियम धाब्यावर बसवून कौठे मलकापूर देवी मंदिरासमोर रविवारी बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race Nagar) घेण्यात आली. या शर्यतीची माहिती घारगाव पोलिसांना मिळाल्यावर पोलीस पथकाने कौठे मलकापूर येथे धाव घेतली. पोलीस आल्याचा सुगावा लागताच शर्यत पाहण्यासाठी आलेल्यांनी तेथून पोबारा केला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरु एक पिकअ‍ॅप, दोन बैलांची जोड, बैलगाडा शर्यतीचा छकडा, बैलाला  पळविण्याकरिता टोचण्यासाठी खिळा असलेली पातळ बांबुची काठी असा 6 लाख 10 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.

याबाबत शर्यत आयोजित करणार्‍या शिवाजी कारंडे यांना पोलिसांनी अधिक माहिती विचारली
असता बैलगाडा शर्यत आयोजक लक्ष्मण गजाबा गिते (रा. कौठे मलकापूर, ता. संगमनेर), राकेश
खैरे, सुरेश चितळकर, बाळासाहेब महाकाळ व इतरांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करुन २ हजार रुपये टोकन लावले होते.

शिवाजी कारंडे आणि लक्ष्मण गिते यांनी शर्यतीचे आयोजन केले होते. बैलगाड्यांची शर्यत इतर आरोपींकडून खेळविताना तसेच बैलांना लोखंडी खिळ्यांचे टोक असलेल्या बांबुची काठीने मारून, टोचून बैलाची शर्यत लावताना आढळून आले. पोलिसांना पाहून इतर लोक पळून गेले आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | चोरीच्या संशयाने मारहाण करुन तरुणाचा खुन, मंचर पोलिसांकडून 4 जणांना अटक

Anti Corruption Trap | स्वातंत्र्यदिनी लाच स्विकारताना महिला ग्रामसेवक ACB च्या जाळ्यात

National Hydrogen Mission | भारतात पाण्यावर चालतील रेल्वे गाड्या आणि कार ! PM नरेंद्र मोदी यांनी केले नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Bullock Cart Race Nagar | 6 arrested from Junnar for organizing bullock cart race in Malkapur, Ahmednagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update