बँक आणि पोस्ट ऑफिसह सरकारी नोकर्‍यांची मेगाभरती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहे. व्यवसाय बंद असल्याने अनेक कंपन्यांनी अनेक नोकरदारांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. मात्र त्यातही सरकारनं अशा तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. जे तरुण सरकारी नोकरीचे स्वप्न पहात आहेत खास त्यांच्यासाठी त्यांच्या योग्यतेनुसार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

बऱ्याचवेळा नोकरीची जाहिरात निघते परंतु याची माहिती विद्यार्थ्यांना माहित नसते. अशाच काही नोकऱ्यांसदर्भात माहिती समोर आली आहे. आयटीबीपीमधधील जीडी कॉन्स्टेबल पदे रिक्त आहेत. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) मधील स्पोर्टस् कोट्यामधील कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ग्रुप सी पदासाठी भरती करण्यात आली आहे. टपाल विभाग, बँक, एअर इंडियासह अनेक सरकारी विभागांमध्ये भरती लवकरच सुरु होणार आहे. भारतीय टपाल विभागात भरती सुरु असून, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे. या पदांवर नोकरीसाठी ते अर्ज करू शकतात. हरयाणा पोस्टल विभागात देखील भरती केली जात आहे.

राजस्थान लोकसेवा आयोगाने (आरपीएससी) सहाय्यक सांख्यिकी अधिकारीपदासाठी अर्ज मागविले आहेत. पदासांसाठी अर्ज करण्याची तारीख 10 जुलै 2020 ते 10 ऑगस्ट 2020 पर्यंत आहे. अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोग अनेक पदांवर भरती करणार आहे. विभाग अधिकारी (गट-ब) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार 31 जुलै 2020 पर्यंत किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. दीनदयाल पोर्ट ट्रस्टने भरती सुरु केली आहे. दीनदयाल पोर्ट ट्रस्टने (डीपीटी) विविध रिक्त पदांवर नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 7 जुलै 2020 पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करु शकतात.