राज्यातील लसीकरणाचा बोजवारा? लशीअभावी बहुतांशी शहरातील लसीकरण बंद, कोव्हिशिल्डचा तुटवडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याला दर महा ३ कोटी लशी उपलब्ध करुन द्याव्यात अशी आशयाचा विधानसभेत ठराव सहमत करण्यात आल्यानंतरही राज्यभरातील लसीकरणाचा (vaccines) बोजवारा उडालेला दिसून येत आहे. लशीअभावी आज मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुण्यासह विविध शहरातील लसीकरण बंद आहे. अनेक ठिकाणी केवळ मामुली लसी उपलब्ध आहेत, तितक्याच लसी मोजक्या केंद्रावर दिल्या जाणार आहेत. प्रामुख्याने सिरम इन्स्टिट्युट (Serum Institute of India) च्या कोविशिल्ड (Covishield) च्या लसीचा तुटवडा सर्वत्र दिसून येत आहे.  burden of vaccination in the state Lack of vaccines mostly stop vaccinations in the city

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

वेगाने लसीकरण (vaccines) केल्यास संभाव्य तिसर्‍या लाटेला रोखणे शक्य होईल, असे तज्ञांकडून सांगितले जात असतानाच राज्यातील लसीकरण (vaccines) मोहिमेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत दररोज एक लाख लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. पुण्यातही ६० हजारांहून अधिक लोकांचे एकाच दिवशी लसीकरण होऊ शकते. मात्र, लशीचा पुरवठा झाला नसल्याने आज मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, पुण्यातील लसीकरण बंद राहणार आहे. पुण्यात केवळ ६ केंद्रावर आज लसीकरण होणार आहे. तेथे कोव्हॅक्सिनची लस देण्यात येणार आहे.

या ठिकाणी प्रत्येकी २०० प्रमाणे केवळ १२०० जणांचे लसीकरण होऊ शकणार आहे. या आठवड्यात केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहीम मंदावली असून आठवड्यात २ दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या अगोदर १ जुलै रोजी लसीकरण बंद होते. मुंबईत मंगळवारी व बुधवारी अनुक्रमे ४२ हजार आणि ५२ हजार लोकांचे लसीकरण झाले होते.

Web Title : burden of vaccination in the state Lack of vaccines mostly stop vaccinations in the city