उस्मानाबाद पोलिसांकडून चोरटयांना अटक

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – दि. 01.09.2019 रोजी 09.00 ते दि. 02.09.2019 रोजी 06.15 वा. दरम्यान तुळजाभावानी साखर कारखाना, नळदुर्ग येथील स्टोअर बिल्डींगच्या शटरचे लॉक तोडून आतमधील तांबा-पितळ धातुचे तिन बार (अंदाजे एकत्रीत वजन 200 किलो ग्रॅम, किं.अं. 36,000/-रु.) व तांबे-पितळ धातुच्या पंधरा नळ्या (किं.अं. 6,000/- रु.) असा एकुण 42,000/- रु. किंमतीचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला होता. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द पोलीस ठाणे, नळदुर्ग येथे भा.दं.वि. कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दि. 03.09.2019 रोजी नोंदवण्यात आला होता.

नमुद गुन्हा तपासात पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे, शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माने यांच्या पथकास (पोलीस हवालदार जगताप, थोरात, पोलीस नाईक चव्हाण, आरसेवाड, पोलीस कॉन्स्टेबल सर्जे, चालक कवडे) दि. 12 सप्टेंबर 2019 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या महितीवरुन पथकाने दादा उध्दव चव्हाण, आबा अप्पा शिंदे दोघे रा. ढोकी यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरची चोरी सुरेश उध्दव चव्हाण, विलास उध्दव चव्हाण, रमेश उध्दव चव्हाण, देविदास वसंत पवार उर्फ दिव्या, नाना नश्या शिंदे, बलु लाला काळे सर्व रा. ढोकी, लाला नवनाथ शिंदे रा. मोहा, माणिक बनशी काळे रा. बनसारोळा यांच्या साथीने केली असल्याचे सांगितले.

त्यांच्या कब्जात साखर कारखान्यामधील तांब्याच्या धातुचे पाईप व वॉल्व किं.अं. 20,000/-रु. व गुन्हा करण्यासाठी वापरलेली ट्रक क्र. एम.एच. 12 एफ.सी. 7327, पिकअप वाहन क्र. एम.एच. 25 ए.जे. 0211 दोन्ही वाहन एकुण किं.अं. 14,00,000/-रु. असा एकुण किं.अं. 14,20,000/-रु. चा माल मिळुन आल्याने दादा उध्दव चव्हाण, आबा अप्पा शिंदे यांना पोलीस ठाणे, नळदुर्ग येथे हजर केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –