घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरामध्ये बंद घरांचे कुलुप तोडून घरफोडी करुन लाखोंचा ऐवज लंपास करणारे दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २३ गुन्हे उघडकीस आले असून १२ लाख ३४ हजार १६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ११ लाख ९१ हजार १६० रुपयांचे ३८८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे.
[amazon_link asins=’B073JPC6R3,B00NFJGUPW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c349b62-ba83-11e8-9cf6-2d7ac731bdd4′]

गजानन मोतीलाल वर्मा (वय-३४ रा. कुपवाड, ता. कवठेमहंकाळ, जि. सांगली), गोरे उर्फ गणेश रती राणा (वय-२९ रा. येवलेवाडी रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने कात्रज चौकातून अटक केली.

पुण्यातील सहकारनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, भागात घरफोड्यांचे प्रमाण जास्त असल्याने या भागात गुन्हे शाखेकडून गस्त घालण्यात येत आहे. गस्त घालत असताना युनिटी १ चे पोलीस कर्मचारी सोनुने आणि युनिट २ चे पोलीस कर्मचारी फरांदे यांना बंद घरामध्ये घरफोडी करणाऱ्यांची माहिती मिळाली. हे सराईत गुन्हेगार तुरुंगातून सुटल्यांतर पुन्हा घरफोडीचे गुन्हे करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कात्रज परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली.
[amazon_link asins=’B06Y5L25M4,B076HSBF11′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’92180642-ba83-11e8-af1e-95a5c33a4f1e’]

अटक करण्यात आलेल्या आरोपींची मैत्री येरवडा तुरुंगात झाली. तरुंगातून बाहेर आल्यानंतर या दोघांनी मिळून घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट १ आणि युनिट २ च्या पथकांनी संयुक्तीक कारवाई करुन या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. आरोपींकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण १२ लाख ३४ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये वारजेमाळवाडी, उत्तमनगर, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, सहकारनगर, दत्तवाडी, फरासखाना, विश्रामबाग, खडक, शिवाजीनगर, दत्तवाडी या पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.

गजराज वर्मा याच्यावर यापुर्वी घरफोडीचे तब्बल २१ गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये जेलमधून सुटल्यानंतर तो सांगली येथून पुण्यात येऊन राहिला. त्याने त्याचा साथिदार गोरे उर्फ गणेश रती राणा याच्या साथीने पुण्यामध्ये घरफोड्या करण्यास सुरुवात केली. गोरे याच्यावर घरफोडीचे ११ गुन्हे दाखल आहेत.
[amazon_link asins=’B079Q42JX7,B006RHKER4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’99b8b0bd-ba83-11e8-ab6c-8dcdb49bb187′]

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील, पोलीस निरक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक गजानन पवार, सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उप निरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, सहायक पोलीस फौजदार शेखर कोळी, सुरेश उगले, पोलीस हवालदार रिझवान जेनेडी, पोलीस नाईक विशाल भिलारे, अतुल गायकवाड, अशोक माने, तुषार खडके, तुषार माळवतकर, अजित फरांदे, प्रास जंगिलवाड, गणेश नरुटे, गजानन सोनुने, प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने केली.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.