घरफोडी करणारे २४ तासात अटकेत ; १० तोळे सोने आणि २ किलो चांदी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – किराणा मालाच्या दुकानाच्या मालकाच्या घरी चोरी करणाऱ्यांना २४ तासात अटक करण्यात समर्थ पोलिसांना यश मिळाले आहे. त्यांनी चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २ किलो वजनाची चांदी असा एकुण ३ लाख १८ हजार ७५० रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.

प्रकरणी मानाराम नसारामजी चौधरी (८८३, रा. राजेवाडी) यांनी फिर्याद दिली होती. चौधरी यांच्या वडिलांचे निधन झाल्याने ते ४ जून रोजी राजस्थानला त्यांच्या गावी गेले होते. ९ ऑगस्ट रोजी पुण्यात आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. समर्थ पोलिसांनी चोरीच्या गुन्हयाचा अवघ्या २४ तासात यशस्वीरित्या तपास करून सर्व चोरीचे दागिने जप्त केले. याप्रकरणी रोहन सचिन घाडगे (१९) आणि उमरान करीम शेख (१९, रा. राजेवाडी, नानापेठ) यांना अटक करण्यात आली आहे. रोहनने त्याचा अल्पवयीन भाऊ आणि उमरानच्या संगणमताने ही चोरी केली होती. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विनायक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलिस हवालदार सुशील लोणकर, राजस शेख, संतोष काळे, पोलिस नाईक टिळेकर, पोलिस साहिल शेख, अनिल qशदे, निलेश साबळे, सचिन पवार, सूरज घनवट, सुमीत खुटे, गणेश कोळी आणि स्वप्नील वाघोले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like