टीम इंडियामधील ‘या’ खेळाडूच्या घरी चोरीचा प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाच्या पश्चिम बंगालमधील सिलगुरी येथील घरात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला आहे. सिलीगुरी येखील शक्तीगड भागात वृद्धीमान साहाच्या कुटुंबाचे जुने घर आहे. मात्र या घरात ते सध्या राहत नाही. शुक्रवारी चोरट्यांनी घरफोडी करण्याचा प्रयत्न करत असताता, साहाच्या काकांनी हा प्रयत्न उधळून लावला आहे.

आमच्या लहानपणी घरफोडीचे प्रकार झालेले आम्हाला माहिती नाही. मला आशा आहे की पोलीस या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करतील. परिवारासह कोलकात्यात राहणार्‍या साहाने घडलेल्या प्रकारावर आपली प्रतिक्रीया दिली. दरम्यान पोलीस घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत असून चोरट्यांचा शोध सुरु आहे. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौर्‍यात कसोटी मालिकेसाठी साहाची भारतीय संघात निवड झाली होती, परंतू त्याला अंतिम संघात जागा मिळाली नाही.