नाणेकरवाडीत घरफोडी ! साडे आठ लाखाचा ऐवज लंपास

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पहाटेच्या सुमारास राहते घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 8 लाख 56 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 10) पहाटे पावणेतीन ते पावणेचारच्या सुमारास नाणेकरवाडी, चाकण येथे घडली. चोरटे ”सीसीटीव्ही कॅमेऱ्यात’ कैद्य झाले आहेत.

गोविंद निवृत्ती जाधव (50, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. तर तीन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे गोविंद यांचे घर कुलूप लावून बंद होते. पहाटे पावणेतीन ते पावणेचारच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी गोविंद यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटामध्ये ठेवलेले 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 4 लाख 4 हजार रुपयांची रोकड आणि 2 हजार 200 रुपयांचे स्पोर्ट्स शूज असा एकूण 8 लाख 56 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

गोविंद यांनी त्यांच्या आणि त्यांच्या भावाच्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी दोन्ही घरासमोरील सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासले असता तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे उघकीस आले आहे. तपास चाकण पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/