Burglary in Pune | धनकवडी परिसरातील फ्लॅट भरदिवसा फोडला, 5 लाखाची रोकड चोरली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – शहरात घरफोड्या (Burglary in Pune) सुरूच असून, सहकारनगर येथील एका सोसायटीत शिरून चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅट फोडत 5 लाख रुपयांची रोकड चोरली आहे. Burglary in Pune | A flat in Dhankawadi area was burglarized all day, Rs 5 lakh cash was stolen

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी तुषार भरगुडे (वय 38, रा. धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरगुडे हे धनकवडी परिसरातील राजमुद्रा सोसायटीत (Rajmudra Society) राहतात.
फिर्यादी यांचा ऑक्सिजन सप्लायचा व्यवसाय आहे.
दरम्यान ते मंगळवारी (२२ जून) सकाळी फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते.
त्यांनी कपाटात पाच लाखांची रोकड ठेवली होती.
यादरम्यान चोरट्यांनी त्यांचा फ्लॅटचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.
तसेच 5 लाखांची रोकड लंपास केली. फिर्यादी हे दुपारी पावणेदोनच्या सुमारास घरी परत आले.
त्यावेळी त्यांना कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पाहणी केली.
त्यांना रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
सहकारनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title :- Burglary in Pune | A flat in Dhankawadi area was burglarized all day, Rs 5 lakh cash was stolen

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर