Burglary in Pune | लहान मुलीचे तोंड दाबून महिलेला धाक दाखवत घरफोडी; हडपसर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Burglary in Pune |स्क्रू ड्रायव्हरने घराची आतून लावलेली कडी उघडून आत शिरलेल्या चोरट्यांनी लहान मुलीचे तोंड दाबून महिलेला धाक दाखवत घरफोडी (Burglary)  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसर परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील कामठे वस्तीत राहतात.

दरम्यान त्या मुलीसह घरी एकट्याच झोपलेल्या असताना दोन चोरट्यांनी स्क्रू ड्रायव्हरने फटीतून स्क्रू ड्रायव्हर आत घालून त्याद्वारे दरवाजाची कडी उघडली व आत प्रवेश केला. त्यानंतर एकाने याच स्क्रू ड्रायव्हरने फिर्यादी यांना धमकावत अंगावर धावून गेले. तर दुसऱ्या चोरट्यांने मुलगी ओरडेल म्हणून तिचे तोंड हाताने दाबून ठेवलेले सोन्याचे दागिने व रोकड असा 19 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. त्या गावी गेल्याने हा गुन्हा काल दाखल करण्यात आला आहे.

Web Titel : Burglary in Pune | Burglary by intimidating a woman by pressing a little girl’s mouth; Incidents in Hadapsar area

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी