Burglary in Pune | पुण्यात डावी भुसारी कॉलनी आणि दत्तनगरमध्ये घरफोडी, लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही महिन्यापासून पुणे शहरात चोरटयांनी धुमाकूळ (Burglary in Pune) घातला आहे. शहरातील अनेक भागातील दिवसाढवळ्या फ्लॅट फोडल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. डावी भुसारी कॉलनीतील (Bhusari Colony kothrud) श्रीगणेश अपार्टमेंट तसेच, दत्तनगरमधील (Dattanagar) साई लुकवड रेसिडेन्सीमधील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही ठिकाणी घरफोडीत (Burglary in Pune) तब्बल एक लाख 15 हजारांचा ऐवज चोरला गेला आहे.

याबाबत माहिती अशी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharti vidyapeeth police station) हद्दीत दत्तनगर परिसरातील असलेल्या साई लुकवड रेसिडेन्सीमधून (sai lakewood residency pune) चोरटयांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल 89 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना 24 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली आहे. दिपीका संजय तुळसकर (वय, 44 रा. दत्तनगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, कोथरूड येथील डावी भुसारी कॉलनीतील (bhusari colony kothrud) अक्षय आनंदराव पाटील (वय, 28 रा. मोकाटेनगर, श्रीगणेश अपार्टमेंट) यांच्या खोलीचा दरवाजा उघडून चोरट्यांनी बॅग, लॅपटॉप, मोबाईल असा जवळजवळ 26 हजारांचा ऐवज चोरला आहे. तर, याप्रकरणाचा तपास कोथरूड पोलीस (Kothrud Police) करीत आहेत.

हे देखील वाचा

Fake website | बनावट ‘website’ कशी ओळखणार?, मुंबई पोलिसांनी दिले 4 महत्त्वाचे पॉइंट, जाणून घ्या

Make Passport at Post Office | खुशखबर ! आता ‘या’ कागदपत्रांव्दारे घरा शेजारच्या पोस्ट ऑफिसमध्ये ‘तात्काळ’ बनवा पासपोर्ट, जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Burglary in Pune | Burglary in bhusary colony kothrud and dattanagar in katraj area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update