Burglary in Pune | चंदननगर आणि ऊरळी कांचनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न, दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Burglary in Pune |शहरात घरफोड्या (Burglary in Pune) करणाऱ्या टोळीने हैदोस घातला असून, एटीएम आणि बँकेत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याच्या दोन घटना घडल्या. चंदननगर (chandannagar) व उरुळीकांचन (uruli kanchan) येथे या घटना घडल्या आहेत. एका प्रकरणात दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात (chandannagar police station) विपीन तिवारी (वय 28) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल कांताराम इचके (वय 26, रा. वाघोली) आणि संदीप शिवाजी निचित (वय 30, रा. खराडी) यांना अटक केली आहे.

येथील चव्हाणनगर (Chavannagar) येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. त्या एटीएममध्ये 11 जुलैला मध्यरात्री दोघा जणांनी प्रवेश करून कटावणी, स्क्रु ड्रायव्हर, पक्कड आणि कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन अर्धवट तोडले. तसेच, एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान केले. आरोपी रोख रक्‍कम चोरण्याचा प्रयत्न करत असताना, पोलिसांना आढळून आले. अधिक तपास सहायक निरीक्षक भालचंद्र ढवळे करत आहेत.

तर दुसरी घटना उरळीकांचन (uruli kanchan) येथील एका बँकेच्या एटीएम सेंटरचे शटर
उचकटून अज्ञातांनी मशीनचा पहिला दरवाजा आणि डिजिलट लॉक तोडून पैसे चोरण्याचा प्रयत्न
केला. तेथे त्यांना यश न मिळाल्याने त्यांनी बँकेचे शटर उचकटून बँकेत प्रवेश केला. तेथे चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथेही पैसे चोरता आले नाहीत. याबाबत विद्यावती चवळे (वय 53) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटना मध्यरात्री घडल्या आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime | Kiss करण्यास रोखल्याने तरुणी भडकल्या, केअर टेकर महिलेला मारहाण करत तोडले दात; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा मुंबई येथे अधिकारी पदांची भरती, ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Burglary in Pune | Burglary in chandannagar and uruli kanchan, police arrest two

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update