Burglary in Pune | पुण्याच्या कात्रज परिसरात घरफोडी, साडे चार लाखाचा ऐवज लंपास

पुणे (Pune): पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Burglary in Pune |  शहरात घरफोड्या सुरूच असून, कात्रज येथील बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी साडे चार लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे (Burglary in Katraj, Pune). जंगजंग पछाडून देखील पोलिसांना हे चोरटे गुंगारा देत आहेत. त्यामुळे मात्र पुणेकर हवालदिल झाले आहेत.

याप्रकरणी किरण शेटे (Kiran Shete) (वय 60) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharti vidyapeeth police station) तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कात्रज येथे मोरे बाग येथील कांचननगरी सोसायटी (Kanchannagar Society) ए. विंग येथे राहत आहेत. दरम्यान ते शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच त्यांच्या घरातून 1 लाखांची रोकड व सोन्याचे दागिने असा 4 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. फिर्यादी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना चोरी झाली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आता पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरट्यांचा शोध घेत आहेत. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

हे देखील वाचा

BJP MLA Suspended | आशिष शेलार, भातखळकर यांच्यासह भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन, विरोधकांना धक्काबुक्की भोवली

Pune Crime News | पुण्याच्या रामवाडी परिसरात वाहने अडवुन चालकांना मारहाण; दोघांना अटक

Pregnant Women Problems | गरोदरपणात रक्ताच्या उलट्या का होतात? कारणे आणि घरगुती उपचार जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Burglary in Pune | Burglary in Katraj area of ​​Pune, theft of four and a half lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update