Burglary in Pune : पुण्याच्या चतुःश्रृंगी, खडकी आणि हडपसर परिसरातील 3 फ्लॅट फोडले, चोरट्यांकडून 8 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात चोरट्यांनी तीन Burglary फ्लॅट फोडत Burglary तबल 8 लाखांचा ऐवज पळविला आहे. पुणेकर गेल्या अनेक वर्षांपासून या चोरट्यांच्या दहशती खाली असून, या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. चतुःश्रृंगी, खडकी आणि हडपसर भागात या घटना घडल्या आहेत.

याप्रकरणी निलेश नीलम गोठी (वय 45) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोठी यांचे दुकान आहे. त्यांचे मॉडेल कॉलनी येथील स्नेही कॉम्प्लेक्सवर तळ मजल्यावर गोडाऊन आहे.

यादरम्यान गोडाऊन कुलूप लावून बंद असताना मंगळवारी रात्री चोरट्यांनी गोडाऊन फोडले. तसेच दोन मायक्रोवेव दोन कुलर आणि दोन एसी असा 1 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. काल सकाळी हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करत आहेत.

तर दुसरी घटना खडकी बाजार येथे घडली असून, नीता कॉर्नर या इमारतीतील बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी 6 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.

सोन्या चांदीचे दागिने व रोकड चोरीला गेली आहे. सेफ्टी दरवाज्याचे लॉक तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व घरफोडी केली आहे.

याप्रकरणी भावेश शांतीलाल नहार (वय 41) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर हडपसर येथील वेताळबाबा वसाहतीत जबरी चोरी करत 1 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात ताराबाई बाळासाहेब नागे (वय 61) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांच्या घराचे लॉक तोडून आरोपीने घरात प्रवेश करत लोखंडी पेटीतून 76 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Pimpri Crime News : बनावट पॅन कार्ड, आधारकार्ड बनवून तरुणाच्या नावावर 8 फायनान्स कंपन्यांमधून घेतले कर्ज; 8 लाखाची फसवणूक.

 

Dahi-Kishmis Benefits : तंदुरूस्त रहायचे असल्यास दह्यामध्ये मनुक्यासोबत मिक्स करा फक्ती ‘ही’ एक गोष्ट, मिळतील आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

 

 

Crime in Pimpri Chinchwad | ‘दादागिरी’ करण्यासाठी चिंचवडमध्ये टोळक्याकडून तोडफोड, दरोडा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 जणांना अटक

 

शॉम्पू केल्याच्या दुसर्‍याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणूनघ्या