Burglary in Pune | वारजे माळवाडी, येरवडा आणि विमाननगर परिसरात घरफोडया

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – शहरात घरफोड्याचा धुमाकूळ सुरूच असून, विविध भागातील तीन फ्लॅट चोरट्यांनी फोडले (Burglary in Pune) आहेत. वारजे माळवाडी (Warje Malwadi), येरवडा (Yerwada) आणि विमानतळ (Vimannager) भागात या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षापासून सुरू असणाऱ्या घरफोड्याच्या घटना (Burglary in Pune) रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. Burglary in Pune | Burglary in Warje Malwadi, Yerwada and Vimannagar area

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) जितेंद्र सोनावणे (वय 59) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे धायरी (Dhayari) येथे राहतात.
त्यांचे एनडीए रोडला (NDA Road) विद्युत कंट्रोलस अँड ऑटो मिशन हे दुकान आहे.
त्याठिकाणी ऑफिस देखील आहे. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बुधवारी ऑफिसच्या स्लायडिंग विंडो बाजूला करून आत प्रवेश केला.
तसेच ऑफिसमधील इलेक्ट्रॉनिक रूमचे कुलूप तोडून आत मधील 70 हजार रुपयांच्या तांब्याच्या पट्या चोरून नेल्या आहेत.
हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
त्यानी वारजे माळवाडी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस (Warje Malwadi Police ) करत आहेत.

दुसरा प्रकार हा येरवडा परिसरात (Yerwada Police Station) घडला असून, येथील जेल रोडवरील (Jail Road) एका इमारतीत बंद फ्लॅटचे कुलूप तोडत 40 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे.
याबाबत हेमंत साळवी (वय 37) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चोरट्यांचा माग सुरू केला आहे.
त्यासोबतच विमाननगर येथील एका फ्लॅटमध्ये असलेल्या ऑफिस फोडत 48 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. याप्रकरणी पृथ्वीराज पाटणकर (वय 30) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title : Burglary in Pune | Burglary in Warje Malwadi, Yerwada and Vimannagar area

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pimpri News | ‘मी तुझ्यासाठी झुरतोय’ म्हणत दीड वर्ष केला तरूणीचा पाठलाग; मजनू बनलेल्या तरूणाला अखेर…